घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांना गती द्या - बी.वेणूगोपाल रेड्डी

 0
घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांना गती द्या - बी.वेणूगोपाल रेड्डी

घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांना गती द्या - अतिरिक्त मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- वेरूळ येथील ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देऊन प्रस्तावित कामे 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे उच्चतंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी आज दिले.  

 श्री घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांची खास वेरूळ श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याच्या मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. अशा पद्धतीने विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय सहनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा हा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.

यासंदर्भात आज श्री. रेड्डी यांनी वेरूळ येथे भेट देऊन कामांची पाहाणी केली व बैठकीत आढावा घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, कार्यकारी अभियंता एस जी केंद्रे, उपअभियंता दिलीप कोलते, खुलताबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख,  भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रशांत सोनवणे, हेमंत हुकरे, राजेश वाकलेकर, पर्यटन विभागाचे  विजय जाधव, दीपक हरणे, वेरूळच्या सरपंच कुसुमताई मिसाळ, श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कृणाल दांडगे, आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  

बैठकीत माहिती देण्यात आली की, वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी 156  कोटी 63 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबत अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज वेरूळ येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर राज्याचे उच्चतंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी घृष्णेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना भेटी देऊन तेथील पाहणी केली. तसेच कामांना गती देण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. यावेळी आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी प्रगतीपथावर कामांची माहिती दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow