प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचा-यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - सरकारी, निम सरकारी, शिक्षक शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, रिक्त पदे अग्रक्रमाने भरावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पदे निरसित करू नये, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यासाठी शासनासोबत चर्चा करून निवेदन दिले. परंतु शासनाने मागण्याची कोणतीही दखल घेतली नाही राज्यातील 17 लाख कर्मचारी कर्मचाऱ्यांनी आजच्या चेतनादिनानिमित्त शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही निदर्शने करण्यात आल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देविदास जरारे यांनी सांगितले. प्रलंबित मागण्याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही तर सप्टेंबर मध्ये संप पुकारला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी इंदुमती थोरात, तलाठी संघाचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी, एस. बी. करपे, वैजनाथ विघोळकर, रामेश्वर मोहिते एन. एस. कांबळे, अशोक वाढई, परेश खोसरे, सतीश भदाणे, ज्ञानेश्वर लोधे, एस.पी.आघाव, विजय साळकर, एन. जे. वाकोडे, संतोष वाघ, राजेश भुसारी, भाई चंद्रकांत चव्हाण, संतोष ताठे यांच्यासह मोठ्या संख्येने राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






