वंचितच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा...
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत क्रांती चौक येथील पक्षाचे कार्यालय येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सध्या सगळीकडेच बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इयत्ता दहावी बारावी आणि पदवीधर आयटीआय तरुण-तरुणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिष्ठाने उपस्थित राहून आवश्यक पात्रता धारक तरुण-तरुणींच्या मुलाखती घेऊन तात्काळ नियुक्तीपत्र देणार आहे. या संधीचा बेरोजगार तरुण, तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष पंकज बनसोडे जिल्हा निरीक्षक योगेश बन व वंचित बहुजन आघाडी जिल्हा शहर युवा आघाडी, महिला आघाडी यांनी केले आहे.
What's Your Reaction?