वक्फ बोर्डाच्या गतिशिल प्रशासनामुळे, वर्षभरात 712 रेकाॅर्डतोड नोंदणी

वक्फ बोर्डाची गतिशील प्रशासनाकडे वाटचाल...
वर्षभरात 712 रिकॉर्डतोड नोंदणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.13(डि-24 न्यूज) गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात साठ कर्मचाऱ्यांची भरती झाल्या नंतर बोर्डाने कामकाजात भरारी घेतली आहे. गेल्या एक वर्षातच संस्था नोंदणीचा रेकॉर्ड गाठत गतिशील प्रशासनाकडे वाटचाल केली आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा कार्यालय सक्रिय झाल्या नंतर वक्फ प्रशासन 712 प्रकरणे मार्गी लावण्यात यशस्वी झाले आहे.
महाराष्ट्रातील मशीद, दरगाह व कब्रस्तान व इतर वक्फ मालमत्तांचे संरक्षण व कायदेशीर देखरेख बोर्डा कडून केली जाते. वर्षानुवर्षे बोर्डाचे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्याचा कारभार सुरू होता, मात्र बोर्डाच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रभावी पाठपुरावा करत शासनाकडून भरतीचा मार्ग मोकळा करून घेतला. पदभरती झाल्यानंतर मंडळाचे कार्यालये सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आले. सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबित नोंदणीचे कामे युध्दपातळीवर करण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोकांना मुख्यकार्यलयात चकरा माराव्या लागू नये व कामकाज गतिशील व्हावे या उद्देशाने राज्यभरात यशस्वीरीत्या जिल्हा कार्यालये कार्यान्वित केली. त्याचाच परिणाम आज दिसत असून लोकांच्या सेवेसाठी वक्फ बोर्ड हा उद्देश्य ही यशस्वी होतांना दिसत आहे.
मंडळाचे अध्यक्ष समीर काझी व सदस्यांच्या तत्परतेने महिन्याला बोर्डाची बैठक होत असून त्यात नोंदणी व्यतिरिक्त इतर कामकाजात ही गती आली आहे. नोंदणी प्रकरणे प्रलंबित राहू नये म्हणून अध्यक्ष समीर काझी व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर शेख यांच्या सुचने नुसार नोंदणी विभाग कार्य करत आहे. नोंदणी विभागाने हामना तहरीम, शोएब मुसा, सनद साक्रीकर, मुफिझ शेख, मुबिन पटेल व सलाम चाऊस, सय्यद सोहेल, जिल्हा वक्फ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने यशस्वीपणे कामगिरी बजावली.
नोंदणीच्या प्रयोगाचा निर्णय यशस्वी ठरल्याने आता अन्य प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केले.
What's Your Reaction?






