शहरात 11 ठिकाणी आयकर विभागाची धाड...?
शहरात 11 ठिकाणी आयकरची धाड...?
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) शहरात सकाळपासून आयकर विभागाचे धाडसत्र सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून डि-24 न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार करचुकवेगिरी मुळे अकरा ठिकाणी हे छापे पडले आहे. यामध्ये बिल्डर असल्याचे समजते. त्यांचे निवासस्थान व कार्यालयांची झाडाझडती करुन कागदपत्रे तपासली जात असल्याचे कळाले. परंतु याबाबत अधिकृत माहिती अद्यापपर्यंत मिळाली नाही. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर नवीन माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल.
What's Your Reaction?