आरक्षणाच्या मुद्द्यावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - एसडिपिआय

 0
आरक्षणाच्या मुद्द्यावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - एसडिपिआय

आरक्षणाच्या मुद्द्यावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - एसडीपिआय

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) आरक्षणाच्या राजकारणात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत द्वेष पसरविण्याचे वक्तव्य केले जात असल्याने सत्ताधारी पक्ष व विरोधीपक्षाचे प्रमुख नेत्यांची भेट घेऊन खालच्या पातळीवर होत असलेले वक्तव्य रोखण्यासाठी हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी राज्यात बैठका घेतल्या जातील. मागासलेल्या वर्गाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण सरकारने मिळवून द्यावे त्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली तरच हा प्रश्न मार्गी लागेल. बेछूट आरोप प्रत्यारोप केले जात आहे याला गंभीरतेने न घेता घटनात्मक अधिकार मागासलेल्या वर्गाला मिळायला हवे यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसडिपिआय एकता, न्याय आणि शांततेसाठी काम करणार अशी माहिती पत्रकार परिषदेत एसडिपिआयचे प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक जाधव धनगावकर, जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, जिल्हा उपाध्यक्ष जब्बार खान उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow