शहरांच्या नामांतराचाही निर्णय रिझर्व्ह फाॅर ऑर्डर, याचिकाकर्ते म्हणाले आम्हाला न्याय मिळेल
शहरांच्या नामांतरचा निर्णय रिझर्व्ह फाॅर ऑर्डर, याचिकाकर्ते म्हणाले आम्हाला न्यायालयावर विश्वास आम्हाला न्याय मिळेल
मुंबई, दि.1(डि-24 न्यूज)
बाॅम्बे हायकोर्टात आज औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावर दोन न्यायमूर्तींच्या बेंच समोर निर्णय रिझर्व्ह फाॅर ऑर्डर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांत निर्णय येण्याची अपेक्षा आहे. याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले आम्हाला इश्वरावर विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल, ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव व ऐतिहासिक ओळख वाचवण्यासाठी आम्ही खंबीरपणे बाजू न्यायालयात मांडली. जनतेने प्रार्थना करावी की ऐतिहासिक नावाची ओळख पूसू न देता जुनेच नाव राहावे. यावेळी न्यायालयात सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर, एड एस एस काजी, याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी, अन्जार कादरी, मोइनुद्दीन जागीरदार व उस्मानाबाद याचिकेचे वकील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?