उद्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल....!

उद्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल....!
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर होणार आहे अशी माहिती बोर्डाने जाहिर प्रकटनाद्वारे दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. बारावी बोर्डाचा निकाल मागिल आठवड्यात जाहीर झाला होता.
पालकांना व विद्यार्थ्यांना उत्सुकता होती निकाल कधी लागणार. उत्सुकता आता संपली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा 9 विभागीय मंडळाचा निकाल उद्या जाहिर होणार आहे. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळाच्या वतीने निकाल जाहिर होईल.
निकालानंतर दुस-या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.
या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल बघता येईल...
https://results.digilocker.gov.in, https://sscresult.mahahsscboard.in, http://sscresult.mkcl.org,
https://results.targetpublications.org, https//results.navneet.com
विद्यार्थ्यांना उपरोक्त संकेतस्थळावर विषय निहाय संपादीत केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही(प्रिंट आऊट) घेता येईल. विशेषत: शाळांना https://mahahscboard. In(in schooled login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
मंडळाने विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छाया प्रतीसाठी बुधवार दिनांक 14 मे ते 28 मे पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचीही मुभा उपलब्ध करुन दिली आहे. पण त्यासाठी त्यांना योग्य ते शुल्क भरण्याची सूचना केली आहे.
What's Your Reaction?






