मुस्लिम बहुल वार्ड बुढीलेनमध्ये शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी.....

 0
मुस्लिम बहुल वार्ड बुढीलेनमध्ये शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी.....

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदयात्रेस सर्व समाजाचा पाठिंबा...

कैलासनगर ते बुढ्ढीलाईन पर्यंत शिवसैनिकांनी नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) : शहराच्या पाणी प्रश्नांची वितरण व्यवस्था सुरळित होण्यासाठी "लबाडांनो पाणी द्या" हे जन आंदोलन शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या आंदोलन अंतर्गत आज 12 मे रोजी संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील कैलास नगर ते संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातील बुढ्ढीलाईन पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. 

या पदयात्रेत सर्व समाजाचा भरभरून पाठिंबा मिळाला. तसेच शिवसैनिकांनी शहराच्या या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन 16 मे रोजी शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हल्ला बोल मोर्चाची माहिती दिली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. 

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, जिल्हा संघटक डॉ.शोएब हाश्मी, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, जयसिंग होलीये, किरण सालपे, माजी नगरसेवक नरेश भालेराव, वैभव सालपे, अनिकेत राठोड, भगवान उंटवाल, रोहित बुधवंत, आशिष अग्रवाल, गणेश बनकर, बाळू हरिश्चंद्र, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, रेखा फलके, नुसरत जहाँ, शोभा साबळे, छाया देवराज, मीनाक्षी शिरसाठ, वंदना जायभये, शकुंतला सरीन व श्रीमती नवकार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow