स्वस्त धान्य दुकानदारांचा संप अखेर मागे, उद्यापासून मिळणार अन्नधान्य

 0
स्वस्त धान्य दुकानदारांचा संप अखेर मागे, उद्यापासून मिळणार अन्नधान्य

स्वस्त धान्य दुकानदारांचा संप अखेर मागे, उद्यापासून मिळणार अन्नधान्य

पत्रकार परिषदेत राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांची माहिती...

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) 1 जानेवारी पासून सुरु असलेले स्वस्त धान्य दुकानदारांचा देशव्यापी संप अखेर आज शासनाने चर्चा करून दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघ व ऑल इंडिया फेअर प्राईज डीलर्स फेडरेशन नवी यांच्या वतीने देशातील व राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागणीसाठी 1 डिसेंबर 2023 पासून आंदोलन सुरू केले होते. 1 जानेवारी पासून देशातील 5,48,000 परवानाधारक व राज्यातील 53 हजार परवानाधारकांनी बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

संपाची दखल घेत शासनाने व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने 9 जानेवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्यासोबत रास्त भाव दुकानदारांची बैठक घेत सकारात्मक चर्चा होऊन रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात त्वरित चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. कमिशनात वाढ करण्याचे आश्वासन दिले. संप मागे घेत अन्नधान्य वितरण सुरू करुन शासनास मदत करावी असे आवाहन केले आहे.

 10 जानेवारी रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रधान सचिव सुमित भांगे, उप सचिव कोळेकर यांच्याशी मुंबई, मंत्रालयात प्रलंबित मागणी संदर्भात चर्चा केली.

कमिशन वाढ करण्याचे मागणीबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

धान्य मोजून देणे. रास्त भाव दुकानदारांना कमी धान्य मिळणार नाही याची काळजी घ्यावी. रास्त भाव दुकानदारांना आता 4G ई-पाॅज मशिन द्यावी. कमिशनची रक्कम महिन्याच्या 5 तारखेच्या आत परवाना धारकांच्या खात्यावर जमा करण्याचे ठोस आश्वासन महासंघास दिले. म्हणून तुर्त हा संप स्थगित करण्यात आला आहे. 16 जानेवारी रोजी दिल्ली येथील मोर्चा स्थगिती केले असल्याची माहिती डि.एन.पाटील यांनी दिली. सर्व रास्त भाव दुकानदारांनी ई-पाॅज मशिन लाईव्ह करुन धान्याचे वितरणास सुरुवात करण्यात यावे. बैठकीत शिष्टमंडळासोबत राज्याध्यक्ष डी.एन.पाटील, जेष्ठ उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, महासचिव चंद्रकांत यादव, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल, जळगाव महेंद्र बोरसे, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, सचिव सचिन कोरडे, कौस्तुभ जोशी यांच्यासह राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. अन्नधान्य वितरण अधिकारी व तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना महासंघाच्या वतीने संप मागे घेत असल्याचे पत्र देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow