स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी ऑनलाईन माहिती द्या एक लाख रुपये बक्षिस मिळवा...

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी ऑनलाईन माहिती द्या एक लाख रुपये बक्षिस मिळवा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर,आरोग्य विभागा मार्फत सर्व नवरात्र मंडळे, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना शिबिर व कर्णपुरा यात्रे मध्ये PCPNDT कार्यक्रमा अंतर्गत गर्भलिंग निदान व स्त्रीभृणहत्या याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
”स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता द्या ऑनलाइन माहिती आणि मिळवा एक लाख बक्षीस!”
अवैधरित्या होणारे गर्भपात व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी रोखण्याच्या दृष्टीने व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित कायदा 2003 व एम.टी.पी. कायदाची प्रभावापण अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने " आमची मुलगी http://amchimulgimaha in" हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावर कोणीही गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताबाबतच्या तक्रार नोंदव शकत. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी संकेतस्थळा बरोबर 18002334475 व 104 हा टोल फ्रि क्रमांक विकसित करण्यात आलेला आहे. संकेतस्थळावर व टोल फ्रि क्रमांकावर तक्रार नोंदविल्यास तक्रारदाराचे नाव गोपनीय राहिल
परंतु तक्रारदाराची इच्छा असल्यास त्यांचे नाव देखील नोंदवू शकतात.
तक्रारदारांनी दिलेल्या माहिती नुसार पी.सी.पी.एन.डी.टी. कायदयाची अंमलबजावणी होऊन जर स्त्रीभृणहत्या रोखण्यास यश आले तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजने अंतर्गत एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. न्यायालयात केस दाखल झाल्यावर ही रक्कम दिली जाते.
What's Your Reaction?






