धुळ्यातून माजी आयपीएस अधिकारी वंचितचे उमेदवार, जालन्यातून प्रभाकर बकले तर औरंगाबाद मधून जावेद कुरैशी...?
माजी आयपीएस अधिकारी वंचितचे धुळ्याचे उमेदवार, जालन्यातून प्रभाकर बकले... औरंगाबाद मधून जावेद कुरैशी यांचे नाव चर्चेत....
लोकसभा निवडणुकीत ओबीसी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात वंचित पुढे....
मुंबई, दि.1(डि-24 न्यूज) धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माजी पोलिस महानिरीक्षक(आयपीएस) अधिकारी
अब्दुल रहेमान यांना उमेदवारी जाहीर करुन मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
या मतदारसंघात मुस्लिम व दलित मते निर्णायक असल्याने वंचितने हि खेळी खेळली आहे. धुळ्यात एमआयएमचे एक आमदार आहेत. धुळ्यात महायुती, महाविकास आघाडी व वंचित अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्व वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला असल्याने धुळ्यातून मुस्लिम उमेदवार दिला तर जालना लोकसभा मतदारसंघात सहा वेळचे भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ओबीसी चेहरा प्रभाकर बकले यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जावेद कुरैशी यांचे नाव औरंगाबाद लोकसभेसाठी चर्चेत आहे. वंचित त्यांना या मतदारसंघातून मैदानात उतरवण्यासाठी आग्रही आहे. एक दोन दिवसात त्यांच्या उमेदवारीवर वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती डि-24 न्यूजला मराठवाडा सचिव तय्यब जफर यांनी दिली आहे.
आठ वंचित बहुजन आघाडीच्या दुस-या यादीत अकरा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे प्रभाकर बकले यांना उमेदवारी दिली आहे तर हिंगोलीतून डॉ.बी.डी.चव्हाण, लातूर मधून मारुती जानकर, धुळे अब्दुल रहेमान, हातकणंगले दादासाहेब चवगोंडा पाटील, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, रावेर संजय ब्राम्हणे, मुंबई उत्तर मध्य अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र स्टेट कमेटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी हि उमेदवारी जाहीर केली आहे.
What's Your Reaction?