अजित पवारांच्या बॅनरवर आमदार सतीश चव्हाण यांचे फोटो...!

अजित पवारांच्या बॅनरवर आमदार सतीश चव्हाण यांचे फोटो...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) आज महायुती सरकारचा शपथविधी मुंबईत आझाद मैदानावर मोठ्या थाटात पार पडला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पण शहरात एका बॅनरची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकले. मिल काॅर्नर सिग्नलजवळ लावलेल्या बॅनरवर आमदार सतीश चव्हाण यांचे फोटो असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. गंगापूर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवलेले सतीश चव्हाण हे घरवापसी करणार का फक्त तिकीटासाठी तिकडे गेले होते का असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ते पुन्हा परतणार का हा संदेश तर देत नाही ना हा बॅनर.... अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?






