खैरेंच्या विरोधात उमेदवार मिळत नसल्याने खैरेंचा विजय निश्चित - खासदार संजय राऊत
खैरेंच्या विरोधात उमेदवार मिळत नसल्याने विजय निश्चित- खासदार संजय राऊत
मोदी,
फडणवीस यांच्या विरोधात राऊतांची टिका... मराठवाड्यातील दलित मुस्लिम महाविकास आघाडीसोबत, भाजपावर केली टिका, रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे यांची जागाही धोक्यात...नांदेडात आदर्शचा टाॅवर ढासळणार... अशोक चव्हाण यांच्यावर टिका , प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा नाही एवढे खचाखच भरले होते कार्यालय...
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) महायुतीला चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नसल्याने खैरेंचा विजय निश्चित. मराठवाड्यातील चारही जागा शिवसेना जिंकणार आहे. रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे यांचीही जागा धोक्यात आहे. लातूर आणि जालन्यात परिवर्तन होईल. महाविकास आघाडीने सर्व उमेदवार घोषित केले आहे. तर महायुतीमध्ये जागावाटपात विवाद सुरू आहे. लाखो दलित मुस्लिम सोबत येत आहे. भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष रमेशभाई खंडागळे यांनी चंद्रकांत खैरे यांना पाठींबा दिल्याचे पत्र दिले आहे. मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. देशात भाजपाला फक्त दोनशे जागा मिळतील. इंडिया आघाडीला 315 ते 310 जागा मिळतील. महाराष्ट्रातील 35 प्लस जागा महाविकास आघाडीला मिळतील. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी नेहमी आमचे दरवाजे खुले आहे त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी लक्षात ठेवावे देश संकटात आहे. संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिंदे गटाचे उमेदवार भाजपा दिल्लीतून ठरवत असल्याने त्यांची परिस्थिती काय झाली अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शहरात ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
निराला बाजार येथे खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे त्यांनी फित कापून उद्घाटन केले.
याप्रसंगी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आमदार उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे अंकुशराव कदम, काँग्रेसचे अनिल पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, साथी सुभाष लोमटे यांची भाषणे झाली. प्रस्तावना किशनचंद तनवानी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, काँग्रेसचे नेते प्रकाश मुगदीया, सुरजीत सिंग खुंगर, एड अभय टाकसाळ, महीला आघाडीच्या शहराध्यक्ष मेहराज इसाक पटेल, राजू वैद्य, बंडू ओक, काँग्रेसचे नामदेव पवार, आम आदमी पार्टीचे निकम, सुग्रीव मुंडे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, नवीन ओबेरॉय, डॉ.शोएब हाश्मी, शेख रब्बानी, समीर कुरेशी, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष फैसल खान, मोहम्मद ताहेर, अश्फाक सलामी, मोहसीन अहेमद, इब्राहिम पठाण, सरोज मसलगे पाटील, दिपाली मिसाळ, सलमा बानो, अनिस पटेल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?