कुख्यात दोन मंगळसूत्र चोर पोलिसांनी केले जेरबंद...!
कुख्यात दोन मंगळसूत्र चोर पोलिसांनी केले जेरबंद
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) जवाहरनगर पोलिसांनी मोठी कामगिरी करून कुख्यात दोन मंगळसूत्र चोरांना अटक करुन 9 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत यांनी दिली आहे.
आरोपिंवर एमपिडिए अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्यांच्यावर चोरी, घरफोडी, बळजबरीने मंगळसूत्र हिसकावणे(चेन स्नेकिंग), मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगारास अखेर जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपिंचे नाव अमोल वैजिनाथ गलाटे, वय 30, राहणार इंदिरानगर, नूरी मस्जिद गारखेडा परिसर, छ.संभाजीनगर(औरंगाबाद), मंगेश वाल्मिक शहाणे, वय 18, राहणार सेंट फाॅल सोसायटी, पैठण यांचा गुन्ह्याच्या तपासकामी जालना कारागृह येथून ताबा घेतला आहे. सहा महिन्यांपासून बळजबरीने मंगळसूत्र हिसकावणे बाबतचे दाखल गुन्ह्यातील सिसिटीव्हि फुटेज तपासले असता आरोपी मोटारसायकलवर दिसून येतात. त्यांना विश्वासात घेऊन यापूर्वी केलेल्या 12 गुन्ह्याची कबुली दिली. दोन मोटारसायकलीसह एकूण 9,65000/1 रुपये मुद्देमाल जप्त केले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मारोती खिल्लारे, सफौ गजेंद्र शिंगाने, पोह क्षिरसागर, पोअ बनकर, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी हि कामगिरी केली आहे.
What's Your Reaction?