कैलास नगर येथे रोखला बालविवाह, दामिनी पथक, जीन्सी पोलिस, बाल कल्याण समितीची कारवाई

 0
कैलास नगर येथे रोखला बालविवाह, दामिनी पथक, जीन्सी पोलिस, बाल कल्याण समितीची कारवाई

कैलास नगर येथे रोखला बालविवाह, दामिनी पथक, जीन्सी पोलिस, बाल कल्याण समितीची कारवाई....

ऊसतोड कामगारांना आपल्या मुलांचा बालविवाह का करावा लागतो याकडे सरकार व समाजाने लक्ष देण्याची गरज....!

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) बीडचे रहिवासी असलेले ऊसतोड कामासाठी जावे लागते म्हणून मुलीचा बालविवाह आटोपून घेण्याचा पर्दाफाश कैलास नगर येथे रोखण्यासाठी दामिनी पथक, जीन्सी पोलिस व बालकल्याण समितीला यश मिळाले आहे. हा बालविवाह कैलास नगर स्मशानभूमीजवळ सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच दामिनी पथकाची टीम, जीन्सी पोलिस व बालकल्याण समितीचे सदस्य विवाहसोहळ्यात दाखल होताच व-हाडींची धावपळ उडाली. मंडपातून नववधूंना उठवले. येथे 500 वराती दिसून आले. मुलीची आई रडत रडत विनवणी करत होती आम्ही ऊसतोड कामगार आहे. कामाला महिने महिने परत घरात येता येत नाही मुलीला कोणाच्या भरवशावर सोडायचे म्हणून लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांना दिली. वधू वरांच्या आई वडीलांना जीन्सी पोलिस ठाण्यात आणले व कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जीन्सी पोलिसांनी दिली आहे.

सदरील कार्यवाही पिएसआय डोंबाळे, पिएसआय काकड, हेकाॅ गदई, भीमराव पवार, दामिनी पथकाचे पिएसआय कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाॅ निर्मला निंभोरे, पोअं अनिता खैरे, सिंधू वाडेकर, प्रियांका भिवसने, बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा परिषद यशवंत इंगोले, नितेश दुर्वे यांनी केली आहे. बालविवाह रोखल्याने टीमचे अभिनंदन केले जात आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow