आजपासून दहावीची परीक्षा सुरू, 1 लाख 86 हजार 814 विद्यार्थी देणार परीक्षा... पोलिसांचा बंदोबस्त
आजपासून दहावीची परीक्षा सुरू, 1 लाख 86 हजार 814 परीक्षार्थी
... पोलिसांचा बंदोबस्त
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षा आज शुक्रवारपासून शांततेत सुरू झाले. उत्तर पत्रिका दहा मिनटापूर्वी मिळणार असल्याने सकाळी 10.30 वाजताच बळीराम पाटील शाळेच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औरंगाबाद विभागातील 5 जिल्ह्यातील 638 केंद्रावर 1 लाख 86 हजार 814 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. काॅपिमुक्त परीक्षेसाठी चित्रिकरण केले जात आहे असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परीक्षा केंद्राच्या आवारात पालकांना सुध्दा थांबता येणार नाही असे बळीराम पाटील परीक्षा केंद्रावर नियोजन केले गेले. पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात आले व हाॅस सापडत नसल्याने मदत केली असे यावेळी पालकांनी सांगितले.
औरंगाबाद विभागीय मंडळाने परीक्षेसाठी संवेदनशील अतिसंवेदनशील केंद्राची यादी जाहीर केली आहे. केंद्र प्रमुखांना काॅपिमुक्त परीक्षा घेण्याचे सूचना देण्यात आले आहे. जिल्ह्यात व शहरात मोठ्या संख्येने भरारी पथके नियुक्त केले आहे. बारावीच्या परीक्षेत काही गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे दहावीच्या परीक्षेत अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. झूम मिटींगद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करुन गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. उपद्रवी केंद्रावरच्या हालचालींचे रेकाॅर्डींग केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सहायक परीक्षकांचा मोबाईल कॅमेरा सुरू ठेवण्याचे आदेश मंडळाने दिले. परीक्षा केंद्रात परीक्षकांना सतत फिरावे लागणार आहे. यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी विभागात नियंत्रण कक्ष उभारला असून 8 अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवतील.
औरंगाबाद जिल्ह्यात 232 केंद्रावर 66989 परीक्षार्थी, बीड जिल्ह्यात 156 केंद्रावर 42464, परभणी 93 केंद्रावर 28752, जालना 103 केंद्रावर 32325, हिंगोली 54 केंद्रावर 16,284 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे.
What's Your Reaction?