पवित्र हज यात्रेसाठी हज हाऊस येथून पहेला जत्था मुंबईकडे रवाना, नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू...

पवित्र हज यात्रेसाठी हज हाऊस येथून पहिला जत्था मुंबईकडे रवाना....नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू...!
हाजी एजाज देशमुख आजारी असताना हज यात्रेकरुंच्या सेवेत हज हाऊसमध्ये ठाण मांडून बसले आहे....
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज), पवित्र हज यात्रा 2025 साठी हज यात्रेकरुंचा पहेला जत्था आज सकाळी दहा वाजेपासून मक्का मदीनासाठी जायला सुरुवात झाली. खाजगी एसी कोच स्लिपर बसने हज हाऊस येथून मुंबई विमानतळावर नेण्यासाठी रवाना झाले. सेंट्रल हज कमेटी, राज्य हज कमेटी व हुज्जाज कमिटीच्या वतीने प्रवास सुखकर करण्यासाठी स्वयंसेवक खिदमात करत आहे. सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
याप्रसंगी हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष मौलाना नसिम मिफ्ताई, मिर्झा रफत बेग, अर्शद इंजिनिअर, हज कमेटीचे सरताज खान, अहेमद पटनी, शाकेर राजा, अश्फाक पठाण, शेख सलिम चिश्ति, सैय्यद सलिम, हामद चाऊस, नसीर खान, अयुब पटेल, सैय्यद अतिक, महेबुब कुरेशी, हाजी याकुब खान, समीर कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नातेवाईकांनी यात्रेकरुंना सोडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हज यात्रेला जाणा-यांचे स्वागत नातेवाईक गळाभेट करत दुवा करण्याची विनंती करत होते. यावेळी नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. हज यात्रेकरुंना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी सांगितले सेंट्रल हज कमेटी व राज्य हज कमेटीने हज हाऊस येथे यात्रेकरुंना नेण्यासाठी चांगले नियोजन केले आहे. हुज्जाज कमेटीने योग्य ट्रेनिंग दिले. युवक लगेज बसमध्ये नेऊन ठेवत आहे. देशात नेहमी अमन शांती राहावी, भारत देशाची प्रगती व्हावी हिच दुवा मक्का मदीना येथे अल्लाह कडे करणार असल्याचे यात्रेकरुंना सांगितले.
सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी सांगितले आज मुंबई विमानतळाकडे नेण्यासाठी पहिल्या दिवशी बसने 750 यात्रेकरु रवाना झाले. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा व कोणताही त्रास प्रवासात होणार नाही याचा खबरदारी हज कमेटीच्या वतीने घेतली जात आहे. औरंगाबाद येथून उद्या आणि 28 मे पर्यंत 1612 हज यात्रेकरु जाणार आहे. वेटींग लिस्ट संपली आहे. महाराष्ट्रातून 18900 यात्रेकरु पवित्र हज यात्रेसाठी यंदा जात आहे. यात्रेकरुंना यंदापासून विमानतळावर रिपोर्टिंग करण्याची सुविधा दिली असल्याने त्रास वाचला. विमानतळावर पासपोर्ट, विजा, तिकीट, रुसुख कार्ड देण्यात येणार आहे. मक्का मदीना येथे राहण्यासाठी योग्य व सुविधायुक्त होटेल बुक केले आहे. हज हाऊस येथे मेडीकल सुविधा, चहा नाश्ता व बसण्याची व प्रवासाची ट्रेनिंग दिली जात आहे. लगेज चेक करुन सोडले जात आहे. यात्रेकरुंची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस झटणा-या हुज्जाज कमेटी व युवकांचे हाजी एजाज देशमुख यांनी आभार मानले
.सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख आजारी असताना आपले कर्तव्य बजावताना हज हाऊसमध्ये हजर आहेत. त्यांना किडनीचा त्रास आहे. डायलिसिसवर आहे. ह्रदयाचा त्रास असताना सुध्दा जोपर्यंत शेवटचा हज यात्रेकरु जाणार नाही तोपर्यंत हज हाऊसमध्येच थांबणार असल्याची भुमिका त्यांनी घेतली. मागिल चार वर्षांपासून ते हज यात्रेकरुंसाठी योगदान देत आहे.
What's Your Reaction?






