मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ हवा, शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

 0
मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ हवा, शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ हवा, शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला मुदत वाढवून हवी आहे म्हणून सरकारचे शिष्टमंडळाने गॅलेक्सि सुपरस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला. आज सायंकाळी मंत्री गिरीश महाजन व रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. आरक्षणाच्या मागणीवर सध्या जरांगे पाटील यांनी आंदोलन करुन राज्याचा दौरा करून जनजागृती करत आहे.

गॅलेक्सि सुपरस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये तब्येतीची तपासणीसाठी जरांगे भरती झाले होते.

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे. 

17 तारखेला सरकारने आपली भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जरांगेंनी म्हटले होते. 24 डिसेंबर नंतर काय होणार याकडे राज्याचे व देशाचे लक्ष लागले असताना सरकारचे शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन वेळ वाढवून मागितले अशी माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. शिष्टमंडळाच्या चर्चेत जरांगेंनी म्हटले की सरकारने जी वेळ दिली होती ती पाळली पाहिजे. गुन्हे मागे घेण्यासाठी शब्दही सरकारने पाळावे असे त्यांनी सांगितले.

मंत्री गिरीश महाजन जरांगेंना म्हणाले की जरा सबुरीने घ्यावे. 24 डिसेंबरला दिलेल्या अल्टिमेटमचा विचार करावा. आरक्षणाच्या विषयावर सरकार काम करत आहे. जरांगेंनी 24 डिसेंबर हि तारीख धरुन बसू नये. मराठा समाजाला आरक्षण सरकार देणार आहे थोडे मागेपुढे होईल असा विश्वास महाजन यांनी जरांगेंना दिला आहे. सरकार मराठा समाजाला शंभर टक्के टिकणारे आरक्षण देईल. आरक्षणावर काम वेगाने सुरू आहे. सरकारच्या कामावर जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार आहे आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजन हे भाजपाचे संकटमोचक समजले जातात त्यांनी जरांगेंची भेट घेऊन वेळ वाढवून मागितले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow