निवडणूक पथकाने पकडली साडेसात लाखांची रोकड...!
निवडणूक पथकाने पकडली साडेसात लाखांची रोकड...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज) 109-औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एसएसटी पथक स्थापित स्थिर सर्वेक्षण पथक सिडको बसस्थानक येथे रात्रीच्या शिफ्टमध्ये कर्तव्य बजावत असताना नामे अजिज सरकार उर्फ अब्दुल सरकार वय 28 राहणार बायजीपूरा यांच्या बॅगची तपासणी केली असता रोख रक्कम साडेसात लाख रुपये व अंदाजे ज्यामध्ये सोने सदृष्य धातूच्या चार नग बांगड्या व चार ग्रॅम सोने सदृष्य धातू आढळून आले. मुद्देमालाबाबत संबंधिताकडे चौकशी केली असता समाधानकारक खुलासा व तेथे सादर न करता आल्यामुळे मुद्देमाल एसएसटी पथकामार्फत जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ कोषागार कार्यालय येथे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आले आहे.
हि कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी आचारसंहिता पथक प्रमुख श्रीमती प्राजक्ता वंजारी, एसएसटी पथक प्रमुख अमोल राठोड, पथक सहा.अमोल गायके, पोलिस कर्मचारी सोनवणे, सचिन सोनी, रविंद्र घडामोडे, श्याम उदावंत, आकाश लोखंडे, चव्हाण यांनी केली आहे.
What's Your Reaction?