निवडणूक प्रक्रीयेतील सर्वांनी जबाबदारीने कारवाही पार पाडावी - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

 0
निवडणूक प्रक्रीयेतील सर्वांनी जबाबदारीने कारवाही पार पाडावी - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

विधानसभा निवडणूक २०२४

निवडणूक प्रक्रियेतील सर्वांनी जबाबदारीने कार्यवाही पार पाडावी

- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

विधानसभानिहाय कामकाजांचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा 

बीड, दि.24 (डि-24 न्यूज) - बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक सक्षम व बिनचूकपणे जबाबदारीने त्यांच्यावर सोपवलेली कामे पार पाडावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केल्या  

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभानिहाय कामकाजांचा आढावा आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी मतदरासंघनिहाय करण्यात आलेल्या सर्व कामकाजांची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. 

या बैठकीस छत्रपती संभाजी नगरचे उपायुक्त जगदिश मिनियार, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, प्र. अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख, प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, तहसीलदार अविनाश शिंगटे, तसेच सर्व विभागाचे नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती. तर बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. 

सहाही मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने प्रशाससनाने केलेली तयारी, टपाली मतपत्रिका, स्वीप कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना दिली. विभागीय आयुक्तांनीही निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत निवडणूक प्रक्रिया अचूकपणे राबविण्याच्या सूचना यावेळी केल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow