महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जलदगतीने कर्ज मंजूरी - अध्यक्ष मिलिंद घारड

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जलदगतीने कर्ज मंजूरी - अध्यक्ष मिलिंद घारड
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र ग्रामीण बँक ही केंद्र व राज्य सरकार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांचे भाग भांडवल असलेली शेड्युल कमर्शियल बँक आहे. महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यात हि बँक कार्यरत आहे. 426 शाखांद्वारे बँकींग व वित्तीय सेवा पुरवण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक कृषी, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण, सुक्ष्म कर्ज इत्यादी क्षेत्रात वित्त पुरवठा करुन महाराष्ट्रातील लोकांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी केले आहे.
विविध कर्ज योजनांमध्ये देखील बँकेचे मंजूरीचे व वाटपाचे प्रमाण समाधानकारक असून वेळोवेळी देखील उद्दीष्ट बँकेने पूर्ण केले असून त्यासाठी बँकेला वेगवेगळ्या पातळीवर गौरवण्यात आले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामासाठी पिक कर्ज वाटपाचे 2424 कोटींचे उद्दिष्ट बँकेने पूर्ण केले असून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणारी राज्यातील एकमेव बँक ठरली आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात देखील मागिल वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांची वाढ झालेली असून सप्टेंबर 2024 अखेरीस बँकेने तब्बल 28,500 कोटी व्यवसायाचा पल्ला गाठला. सुलभ व जलदरित्या कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी "कर्ज उत्पत्ती प्रणाली"(LOS) हे अद्ययावत तंत्रज्ञान बँकेच्या सर्व शाखांसाठी लागू केले आहे. अर्जदारांची आवश्यक कागदपत्रे या कर्ज प्रणालीमध्ये डिजिटल स्वरूपात दाखल केल्यानंतर कर्ज प्रकरणासाठी आवश्यक शासकीय उतारे, पतमानांकन अहवाल तसेच केवायसीचे सत्यापण हे सदर प्रणालीमध्ये स्वयंचलित रित्या उपलब्ध होते. त्यामुळे कर्ज प्रक्रीया करण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे व अहवाल एकाच ठिकाणी व त्वरित उपलब्ध झाल्यामुळे कर्ज मंजुरी देखील सुलभ व जलद झालेली आहे. या प्रणालीमुळे वैयक्तिक कर्ज तसेच वाहन कर्ज मिळवण्यासाठी लागणारा वेळ हा 7 ते 10 दिवसांवरून 1 ते 2 दिवसांवर आलेला आहे. त्याचप्रमाणे उद्योग कर्ज प्रक्रीयेसाठी लागणारा वेळ देखील 10 ते 15 दिवसांवरुन फक्त 3 ते 5 दिवस एवढा झालेला आहे. व्हिडिओ केवायसीद्वारे नवीन बचत खाते उघडण्यासाठी सेवा सुरु झाल्याने ग्राहक आपल्या सोयीनुसार घरबसल्या बँकेच्या मोबाईल ऐपद्वारे नवीन बचत खाते उघडू शकतात. सर्व ग्राहकांसाठी 222 दिवस, 333 दिवस व 444 दिवसाच्या विशेष ठेव योजना अतिशय आकर्षक व्याजदरात उपलब्ध करून दिले. योजनांमध्ये जेष्ठ नागरीकांसाठी अर्धा टक्का अधिक व्याजदराची सुविधा देखील देण्यात आली आहे. वेरुळ येथील कैलाश मंदिर यथोचित गौरव करण्यासाठी बँकेने मंदीराचे चित्र असलेल्या विशिष्ट एटीएम कार्डचे अनावरण केले असून त्याद्वारे या वास्तूचा प्रचार प्रसार होण्यास व पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी सहाय्यक सरव्यवस्थापक षण्मुख र.वानखेडे यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






