गुंठेवारी भरल्यानंतर मालमत्ता बाधित झाली तर मोबदला मिळेल का...? - मोईन इनामदार

गुंठेवारी विकास नियमितीकरण प्रशासनाकडून जाचक अटी टाकून अडवणूक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) -
महानगरपालिकेच्या गुंठेवारी कक्षामध्ये नागरीकांची अडवणूक केली जात आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय संचिका मंजूर होत नाही. गुंठेवारी विकास नियमितीकरण प्रशासनाकडून जाचक अटी टाकल्यामुळे मालमत्ताधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे. गुंठेवारी भरुन बांधकाम नियमित करुन घ्या अशा जाहिराती शहरात झळकत आहे परंतु गुंठेवारी भरल्यानंतर नियमितीकरण दाखल्यावर लिहिले आहे "महानगरपालिका भविष्यात बाधित क्षेत्र, विना अट, विना मोबदला हस्तांतरीत करुन द्यावे लागेल व हस्तांतरीत करण्यात आलेल्या बांधकाम क्षेत्राबाबत कोणताही मोबदला देय राहणार नाही, त्याची सर्वस्वी जवाबदारी अर्जदारावर राहिल" सदरची अट ही अत्यंत जाचक असून महापालिकेने कोणताही सारासार विचार न करता केवळ सुड बुध्दीने व तुच्छतेच्या भावनेने टाकलेली आहे. हि अट पुर्णत: बेकायदेशीर असून भारतीय संविधानाने नागरीकांना त्यांच्या जागेच्या व बांधकामाच्या बदलत्या मोबदला मिळण्याबाबतच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. एखाद्या मालमत्ताधारकाने बांधकाम रेग्युलराईज करण्यासाठी गुंठेवारी भरली व त्याची मालमत्ता बाधित होत असेल तर मोबदला मिळण्यास या अटींमुळे अडचणी येणार आहे. मनपा प्रशासन धोकाधडी करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन इनामदार यांनी केला आहे.
गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात पुराव्यासहीत मनपा आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला परंतु आतापर्यंत सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले नाही. सरकारने लवकर चौकशीचे आदेश दिले नाही तर राज्यपाल व मुख्यमंत्री यांची भेट घेवून मागणी करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. गुंठेवारीतील जाचक अटी शिथील करण्याची मागणी त्यांनी केली.
What's Your Reaction?






