पोलिस दलास अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी नीधीची कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री अब्दुल सत्तार
पोलिस दलास अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी नीधीची कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री अब्दुल सत्तार
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) पोलिसांना अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी तसेच समस्या सोडविण्यासाठी नीधीची कमतरता पडू देणार नाही. पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर असतात. त्यामुळे सामान्य माणूस निवांत झोपू शकतो. त्यामुळे पोलिसांचे बळकटीकरण करणे अत्यावश्यक आहे. पोलिस शिपाई हा या विभागाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे बारकाईने निराकरण अत्यावश्यक आहे. त्याकरिता त्यांना सुविधायुक्त निवासस्थाने, जुने झालेले पोलिस ठाण्याचे इमारतीचे ठिकाणी अद्ययावत व सुसज्ज पोलिस ठाणे तयार करणे. शासन जागेवर असलेले पोलिस ठाण्याचे जागा त्या पोलिस ठाण्याचे नावावर करणे, त्या ठिकाणी अतिक्रमण नसावे. अशा विविध कामे शासनाच्या वतीने करुन देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आज एका उद्घाटन कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास, पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पोलिस अधीक्षक कार्यालय, मुख्यालय लगत असलेल्या गोकुळ पोलिस कवायत मैदानाचे जिल्हा नियोजन नीधीच्या माध्यमातून नुतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये कवायत मैदानाचे सपाटीकरण, निवारा शेड, भुमिगत सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम व लोखंडी जाळी बसविणे, सॅल्यूटींग बेस बांधकाम व सुशोभीकरण व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थानांचे दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली होती. यांचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे, आमदार प्रदीप जैस्वाल, विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रविण पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांची उपस्थिती होती.
याचप्रमाणे गंगापूर व वैजापूर येथे सिसिटीव्ही सर्व्हिलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या विविध समस्यांची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी आभार व्यक्त के
ले.
What's Your Reaction?