अखेर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक आयुक्त पदाचा पदभार श्रीमती विशाखा आढाव यांनी स्विकारला

अल्पसंख्यांक आयुक्तपदी विशाखा आढाव यांची नियुक्ती
---पद भरतीस प्राधान्य देणार- आढाव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत चालणाऱ्या अल्पसंख्यांक आयुक्तालयात आयुक्तपदी विशाखा आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज हज हाऊस येथील मुख्यालयात त्यांनी पदभार घेतला. काही महीन्यांपासून हे पद रिक्त होते अखेर अतिरिक्त पदभार त्यांनी स्विकारला. अल्पसंख्याक समाजातील योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशाखा आढाव सध्या अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय येथे अवर सचिव म्हणून कार्यरत आहेत. शासना कडून आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश काढण्यात आले होते. विशाखा आढाव यांची मंत्रालयातील अत्यंत कर्तबगार, अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख आहेत. या पूर्वी त्यांनी ग्रामविकास,सामान्य प्रशासन, जलसंपदा व समाज कल्याण विभागात कार्य केले. त्यामुळे त्यांना समाजातील अडीअडचणींची चांगलीच जाण आहे. त्यांच्या नियुक्ती मुळे राज्य शासना कडून अल्पसंख्यांक समाजा साठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अमलबाजवणी होईल. अशी अपेक्षा अल्पसंख्यांक समाजातील कार्यरत विविध संघटना, व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पद भरतीस प्राधान्य देणार...
अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर शासना कडून एकूण 36 अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यावर तातडीने अमलबजावणी व्हावी या साठी मी प्रयत्न करणार असल्याचे विशाखा आढाव यांनी सांगितले. पद भरती झाल्यास आयुक्तालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी आयुक्तालयचे सहआयुक्त प्रशांत अंधारे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






