बिआरएसचे पहिलेच आंदोलन पाण्यासाठी, शाळा खाजगीकरणाला विरोध
बिआरएसचे पहिलेच आंदोलन पाण्यासाठी...
सरकारी शाळा खाजगीकरण विरोधात थाली बजाओ आंदोलन...
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) बिआरएसची महाराष्ट्रात पक्षबांधणी सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरात पहिलेच आंदोलन पाण्यासाठी करण्यात आले.
भारत राष्ट्र समितीचे नेते अब्दुल कदीर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकात थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. शहरात आठ ते नऊ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाला इशारा देण्यात आला पाणीपुरवठा वेळापत्रकात दुरुस्ती करून शहरात पाणी टंचाई निर्माण होणार नाही यासाठी नियोजन करावे. यावेळी राज्य सरकार व मनपा प्रशासनाच्या विरोधात थाळी वाजवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सरकारी शाळा खाजगीकरण करण्यास विरोध आहे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कदीर मौलाना यांनी दिला आहे. गरीब विद्यार्थी जि.प. शाळेत शिक्षण घेतात त्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये याचा परिणाम शिक्षकांच्या नोकरीवर सुध्दा होणार आहे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, या आंदोलनाला मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी, सुनिता सोनटक्के, माजी नगरसेवक इसाक अंडेवाला, महेविश खान, अर्शद अहेमद, इम्रान खान, अमोल भावसार, अजहर शेख, शेख लतिफ, अजीम खान, शेख शरीफ, नसरीन बाजी, कौसाबाई, दैवशाली फंदे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?