मराठा आंदोलक अक्रामक, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू
मराठा आंदोलक अक्रामक, क्रांतीचौकात जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलन
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 24 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. चाळीस दिवसांची मुदत संपली तरी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नसल्याने राज्यातील मराठा समाज अक्रामक झाले आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांनी तर औषधी व पाणीसुद्धा घेणार नाही असा निर्धार केला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून क्रांतीचौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला हजारो मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला विजय काकडे पाटील यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले दोन तीन दिवसात शासनाने सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा व आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन उग्र रूप धारण करणार आहे. लोकप्रतिनिधी यांना गावात येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलनात गणेश उगले पाटील, गणेमू लोखंडे पाटील, जयाजीराव सुर्यवंशी, सुकन्या भोसले, अशोक वाघ पाटील, सरीन सरकटे, परमेश्वर नलावडे, अक्षय ताठे, जी.के.गाडेकर, वैभव बोडखे, पंढरीनाथ काकडे, लक्ष्मण नवले पाटील आदी सहभागी झाले आहेत.
What's Your Reaction?