नाही तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही - अॅड प्रकाश आंबेडकर
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही खुले आव्हान !
नागपूर,दि.25(डि-24 न्यूज) पक्ष वाढवायचा की मोदींना घालवायचे हे आधी स्पष्ट करा, जागांच्या वाटपावरून जर अडून बसाल तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात हल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली होती.
आरएसएसवाल्यांना हिंदूंना एकत्रित करण्याचा एक कार्यक्रम देतो तो म्हणजे, एक हिंदू धर्मशास्त्राचे विद्यापीठ उभ करायचं जे धर्माशिवाय दुसरं काय करणार नाही. आणि एक कायदा करायचा की, हिंदू पुजारी हा त्या विद्यापीठातील पदवीधर असायला हवा. तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. हा माझा सल्ला आहे. हा मान्य केला तर मी तुम्हाला हाथ देईल असे आव्हान त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना केले आहे.
पूर्वी सत्तेचे केंद्र हे धर्म असायचे, आता सत्ता केंद्र हे संसद आहे. संसदेवर ज्याचा ताबा असतो त्यांचीच व्यवस्था असते, म्हणून आपल्याला आपली व्यवस्था कायम ठेवायची असेल तर संसद आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
मनुस्मृतीची व्यवस्था ही अधिकार हिसाकावून घेणारी व्यवस्था आहे. समता प्रस्थापित न करणारी व्यवस्था आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी व्यवस्था आहे, न्याय न देणारी आहे. म्हणून आपण संविधान निर्मित व्यवस्था आपण पुरस्कृत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
समाजामध्ये एकोपा पाहिजे की, विभक्तपणा पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. गुलामी आणि विषमता पाहिजे असेल तर विभक्त पणाचा आधार घ्यावा लागतो. यातून आपण द्वेष करायला सुरुवात करतो. आपली क्रांती ही मानवतावादासाठी आहे. त्यासाठी इथल्या मानवांना एकत्रित करणे हे आपले कार्य आहे. हा लढा विषमते विरुध्द एकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. वर्चस्व नावाची संकल्पना ही विभक्तवादी विचारांतचं जन्माला येते आणि टिकते. संघटित राहण्याच्या विचारांत वर्चस्व वादाला जागाचं नसते,असे त्यांनी म्हटले आहे.
दाबावाचं राजकारण सुरू आहे, दमबाजीचे राजकारण सुरू आहे, ब्लैकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, कशासाठी ? तर मार्च - एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायला तयार आहोत मात्र, आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे असेही त्यांनी आजच्या सभेत सांगितले. नागपूरमधून जे प्रतिक्रांतीचे भूत उभ राहत आहे त्याला गाडण्यासाठी आम्ही निघालो आहोत. काँग्रेसवाचे राहुल गांधी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असतील त्यांच्या मदतीला आम्ही निघालो आहोत. पण दुर्दैवाने ते नागपुरच्या भुताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडायला निघाले आहेत. यातून कोणाचं भलं होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडी सोबत आली तर त्यांचं स्वागतचं आहे. पण जर नाही आली तरी आपल्याला लढावेचं लागणार आहे. लढायचे असेल तर आजपासून ठरवले पाहिजे की, फालतू चर्चा बंद करून मी ज्या मतदार संघात आहे तो मतदारसंघ आम्ही जिंकल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. काही घटनांवर खुलासा करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी भागवत आणि आरएसएस यांना केले दिले आहे.
उद्याची लोकसभा ही फुले - शाहू - आंबेडकरवादी विचारांनी चालली पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यासाठी जे करायचे आहे ते करण्यासाठीं सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे.
सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर व्यवस्थेत असते. व्यवस्था टिकली तर आपण टिकतो. म्हणून ही व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे.
या सभेला वंचित बहुजन आघडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रा.अंजलीताई आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निशाताई शेंडे, सविताताई मुंडे, डॉ. गजाला खान, यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?