जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारला, म्हणाले प्रशासन गतिमान व पारदर्शक, संवेदनशील करण्यास प्राधान्य

 0
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारला, म्हणाले प्रशासन गतिमान व पारदर्शक, संवेदनशील करण्यास प्राधान्य

जिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारला पदभार ; प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास सर्वोच्च प्राधान्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , औरंगाबाद दि.15(डि-24 न्यूज):- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी आपला पदभार स्विकारला. जिल्ह्याचे प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल,असा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून श्री. स्वामी यांनी आपला पदभार स्विकारला. जी. श्रीकांत यांनी श्री. स्वामी यांचे स्वागत केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी मनोदय व्यक्त केला की, जिल्हा हा सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासासाठी अधिक काम करणे. आता प्राथम्याने निवडणूक प्रक्रिया राबविणे, जिल्ह्यातील टंचाई विषयक उपाययोजना करणे या विषयांना प्राधान्य असेल. त्याच बरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करणे हे उद्दिष्ट असेल. प्रशासना बद्दल जनतेच्या मनात कोणतेही किंतू परंतू राहु नये यासाठी गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशीलतेने काम करण्यास आपले प्राधान्य असेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow