दिव्यांगांनी दाखवले आपले कलाविष्कार...!
दिव्यांगाच्या विविध स्पर्धा संपन्न...
दिव्यांगांनी दाखवले आपले कलाविष्कार....
विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद...
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) दिव्यांगांच्या सुप्त गुणांचे कलाविष्कार घडविण्याकरिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून व
अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, उप आयुक्त अंकुश पांढरे व मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीव्यांगाच्या विविध कलाविष्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम उप आयुक्त 4 अंकुश पांढरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, कला दालन व्यवस्थापक हंसराज बंसवाल, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात स्पर्धक व त्यांचे पालक यांची उपस्थिती होती.
या स्पर्धांमध्ये चित्रकला, रंगभरण व शाडू माती पासुन क्ले बनविणे, चित्रकला, हस्तकला, वारली पेंटिंग व कॅलिग्राफी ,रांगोळी या स्पर्धांचा समावेश होता. सदरील स्पर्धा महानगरपालिका टाऊन हॉल, कला दालन येथे पार पडल्या.
या सर्व स्पर्धांना दिव्यांगानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या कलाविष्काराचे सर्वांना दर्शन घडवले. त्यांनी काढलेले चित्र, चित्रात रंग भरणे, क्ले पासून विविध वस्तू बनविणे ,त्यांनी काढलेली वारली पेंटिंग, विविध रांगोळ्यानी उपस्थितांना तोंडात बोटे घालयला भाग पाडले.
या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र ,स्मृती चिन्ह व प्रथम ,द्वितीय ,तृतीय व दोन उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.
यात बक्षिसांचे प्रथम क्रमांक 5000/- ,द्वितीय 3000/- ,तृतीय 2000/-
उत्तेजनार्थ 1000/- असे स्वरूप होते.
What's Your Reaction?