वंदे भारत एक्स्प्रेस दुरुस्ती नंतर रुळावर, जालना मध्ये तात्काळ झाली दुरुस्ती

 0
वंदे भारत एक्स्प्रेस दुरुस्ती नंतर रुळावर, जालना मध्ये तात्काळ झाली दुरुस्ती

नांदेड विभागाच्या टीमने केलेल्या जलद कारवाईमुळे दुर्दैवी घटना घडली तरीही वंदे भारत एक्स्प्रेस सुरक्षित आणि वेळेवर धावली

नांदेड,दि.15(डि-24 न्यूज)

13 जानेवारी रोजी संध्याकाळी, पोतुल रेल्वे स्थानकाजवळ येत असताना, काही गुरे रुळांवर भटकत आली आणि गाडी क्रमांक 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जालना वंदे भारत एक्सप्रेस समोर आली. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. यात एक बैल गाडी खाली आल्याने दगावला. ट्रेन सुरक्षित केल्यानंतर, चालक दलाने खराब झालेले भाग पूर्णपणे तपासले आणि ते वेगळे केले, चालक दलाने तत्परता दाखवत इंजिनमध्ये बिघाड टाळण्यासाठी योग्य ती कामगिरी पार पडली. ऑन-ग्राउंड इंजिनीअरिंग कर्मचार्‍यांनी वंदे भारतच्या अंडर ट्रकची स्वच्छता करण्यास करण्यात मदत केली आणि वंदे भारत एक्स्प्रेस घटनास्थळावरून 7.18 वाजता पुढे रवाना झाली. आम्ही इथे स्पष्ट करू इच्छितो कि काही बातम्यांच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे वंदे भारत एक्स्प्रेस चे इंजिन फेल झाले नाही.

नांदेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, चीफ लोको इन्स्पेक्टर, वंदे भारतचे कर्मचारी, ऑन-ग्राउंड सपोर्ट स्टाफ आणि कंट्रोलर्स यांच्या विशेष प्रयत्नांनी वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत 8.30 वाजता जालना येथे पोहोचली. 

पुढे, श्री साठे, सहाय्यक यांत्रिक अभियंता (पॉवर)/नांदेड यांनी मुख्य लोको निरीक्षक/मनमाड, स्टेशन अधीक्षक/जालना, वरिष्ठ विभाग अभियंता/केरेज आणि वेगन /जालना आणि फैवेर्ली ट्रान्सपोर्ट रेल टेक्च्नोलोजीज प्राइवेट लिमिटेड ( Faively Transport Rail Technologies Pvt Ltd) चे एक अभियंता यांच्या पथकाचे नेतृत्व केले. खराब झालेले भाग आणि समोरचे कव्हर मध्यरात्री यशस्वीरित्या बदलले. यामुळे दुस-या दिवशी 14.01.2024 रोजी प्रवाशांच्या पूर्ण सेवेत असलेली वंदे भारत एक्स्प्रेस जालन्याहून योग्य वेळी सकाळी 5.5 वाजता सुटली आणि नियोजित वेळेपूर्वी मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आली.

श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक /नांदेड यांनी नांदेड विभागीय कार्यालयातून संपूर्ण ऑपरेशनचे कंट्रोल केले.

श्रीमती. नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक /नांदेड यांनी संपूर्ण टीमचे त्यांच्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow