23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, चौकशीला वेग, कोणाचे नगरसेवक पद जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले...?
23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, चौकशीला वेग...कोणाचे जाणार याकडे शहरवासीयांचे लक्ष...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महापालिकेतील नव्याने निवडून आलेल्या 23 नगरसेवकांविरोधातील अपात्रतेच्या तक्रारींवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे रखडलेल्या प्रकरणांची चौकशी लवकरच पूर्ण करून अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. तिसऱ्या अपत्याची माहिती लपवणे, शपथपत्रात चुकीची माहिती देणे, अतिक्रमण करणे तसेच अतिक्रमण हटविण्यास विरोध करणे आदी कारणांवरून संबंधित नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कोणाचे नगरसेवक पद जाते किंवा तसेच राहते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?