पदवीधर नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा अमेस्टोच्या वतीने सत्कार

 0
पदवीधर नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा अमेस्टोच्या वतीने सत्कार

पदवीधर नवनिर्वाचित आमदार डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा अमेस्टोच्या वतीने सत्कार 

विविध मागणीचे दिले निवेदन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- ऑल महाराष्ट्र मायनाॅरिटी एज्युकेशन सोसायटीज अँड टिचर्स ऑर्गनायझेशन (Amesto) च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्याक विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना यावेळी 20 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी शासन स्तरावर समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

याप्रसंगी द्वारकाभाऊ पाथ्रीकर,

अब्दुल रहीम मोगल, इलहाजोद्दीन फारुकी, जीया सर, डॉ.हाफिज देशमुख, जिशान देशमुख, अमान देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्याक समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास समजला जातो. काँग्रेस व आघाडी सरकारच्या काळात नेमण्यात आलेल्या सच्चर समिती आणि महेमूद उर रहमान आयोगाच्या अहवालातूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. आजही अल्पसंख्याक समाजाचे अनेक शैक्षणिक प्रश्न प्रलंबित असून, विद्यमान सरकारकडून अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शंभर मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावे. त्यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुदानासह मंजुरी द्यावी.

आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्याकबहुल शंभर ठिकाणी सातवीपर्यंतच्या उर्दू शाळा आहे तेथे विना अनुदानित तत्वावर हायस्कूल सुरू करण्यासाठी जीआर निघाला होता परंतु युती सरकारच्या काळात अंमलबजावणी झाली नाही तो लागू करण्यात यावा. विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती सुरू करावी. बार्टी, सारथी सारखी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी संस्था निर्माण करावी. उच्च व तंत्रशिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रती वर्ष 50 हजार शिष्यवृत्ती मिळावी. तुकडी मान्यतेसाठी निकष शिथिल करण्यात यावे. वाढीव विद्यार्थी संख्येला अनुदानासह तुकड्या मंजूर करून कोटा निश्चित करण्यात यावा. ओबीसी 27 टक्के आरक्षणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी किमान 5 टक्के निश्चित कोटा देण्यात यावा व आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षणात 10 टक्के आरक्षण किमान 3 टक्के. अल्पसंख्याक बहुल भागात प्रत्येक जिल्ह्यात उर्दू घर बांधण्यात यावे त्यात लायब्ररीची व्यवस्था करण्यात यावी. मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर उर्दू साहित्य संमेलन घेण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर माॅडल उर्दू हायस्कूल (इंटरनॅशनल) शासकीय स्तरावर सुरू करण्यात यावे. अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभूत सुविधा फक्त पाच वर्षांपर्यंत मिळते ती वाढवून दहा वर्षांपर्यंत करुन रक्कम दोन लाखाऐवजी पाच लाख करावी. केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे सुटसुटीत करणे व शिष्यवृत्तीची रक्कम एक हजार ऐवजी पाच हजार करणे बाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. शिक्षक पात्रता परीक्षा सेवेत असणाऱ्या व ज्यांना शिक्षणाधिकारी यांनी वैयक्तिक मान्यता व कायम मान्यता दिली आहे अशा शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्यासाठी पाठपुरावा करावा. मुस्लिम समाजासाठी मा‌.उच्च न्यायालयाने मान्य केलेले पाच टक्के शैक्षणिक आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.

अशा विविध मागणीचे निवेदन नवनिर्वाचित आमदार डॉ प्रतापसिंह पाटील यांना अमेस्टोने सत्कार प्रसंगी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow