जिल्हा विकासाचे प्रस्ताव तातडीने सादर करा, पालकमंत्री भूमरे यांचे निर्देश
जिल्हा विकासाचे प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री भुमरे यांचे निर्देश
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज)- मराठवाडा मुक्तिसंग्राम सांगता सोहळ्यानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यात राबवावयाच्या विविध विकास योजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तयार करुन तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे,असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सादर करावयाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेतला.
या बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, विधान सभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे,पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हाधिकारी औरंगाबाद आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुमरे म्हणाले की, नियोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडण्याची व सोडवणूक करण्याची संधी मिळणार आहे. याअनुषंगाने प्रत्येक विभागाने विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, त्यासाठी लागणारा निधी याबाबतची माहितीचा परिपूर्ण प्रस्ताव विहित कालमर्यादेत सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
What's Your Reaction?