जेष्ठ पत्रकार आर.वाय.जाबा यांचे निधन, पत्रकारिता क्षेत्रात हळहळ

 0
जेष्ठ पत्रकार आर.वाय.जाबा यांचे निधन, पत्रकारिता क्षेत्रात हळहळ

निधन वार्ता

ज्येष्ठ पत्रकार आर.वाय. जाबा यांचे निधन

औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) ज्येष्ठ पत्रकार तथा सायं. दैनिक स्वरगंगा आणि साप्ताहिक स्वरगंगाचे संस्थापक संपादक रेवणसिद्ध योगीनाथ जाबा (अप्पा) यांचे गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , मुलगी , जावई, सुना, नातवंडे , पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास क्रांतीचौकातील लिंगायत स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वृत्तपत्र क्षेत्रात तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

वृत्तपत्र क्षेत्रात ते 'आर.वाय.' उर्फ अप्पा या नावाने परिचित होते. 10 फेब्रुवारी 1935 रोजी सोलापूर येथे आर. वाय. जाबा यांचा जन्म झाला. 1970 साली औरंगाबाद येथील दै. अजिंठा या वृत्तपत्रातून मराठवाडा प्रतिनिधी म्हणून आर.वाय. जाबा यांनी पत्रकारिता सुरू केली.

आर.वाय. जाबा यांनी साप्ताहिक स्वरगंगाची 19 डिसेंबर 1976 रोजी आणि 19 डिसेंबर 1985 रोजी सायं. दैनिक स्वरगंगाची सुरुवात केलेली होती. खोकडपुरा येथील जाबा प्रिंटींग प्रेस या नावाने त्यांनी अनेक दशके प्रिंटींग क्षेत्रातही व्यवसाय केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शेकडो पत्रकार, संपादक तयार झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे काही काळ प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow