मुंबईला वेगळे कोणी करु शकत नाही... इंडिया आघाडीवर भडकले मंत्री सुधिर मुनगंटीवार
I.N.D.I.A आघाडीवर भडकले मंत्री सुधिर मुनगंटीवार
मुंबईत 26 पक्षाचे नेते मेजवानी खायला आले... मुंबई तोडण्याचे अफवा पसरवून महाराष्ट्राचे अपमान करत आहे... हल्लाबोल...म्हणाले काँग्रेस आणि शिवसेनेचा शरद पवारांवर विश्वास नाही...
शिंदे व अजित पवार यांच्या सोबतचा भाजपा आवडत नाही तर देश सेवेतील भाजपा आवडतो
औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) देशातील विरोधीपक्षांनी I.N.D.I.A आघाडी बनवली आहे. आज आणि उद्या मुंबईत बैठक सुरु आहे. भाजपाचे मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या बैठकीवर सडकून टीका केली. म्हणाले हि आघाडी देश सेवेसाठी नाही तर सत्तेसाठी बनलेली आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष हे सत्तांध आहे. घराणेशाहीचे राजकारण करणारे हे विविध पक्ष मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी एका ठिकाणी आले आहे. हे मुळीच शक्य नाही. शरद पवार यांच्यावर शिवसेना व काँग्रेसचा विश्वास राहिलेला नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले पंतप्रधान मोदी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका करतात. भ्रष्टाचाराचे आरोप लावतात मग कार्यवाही का करत नाही. एका बाजूला शिवसेनेचे नेते तर दुसरीकडे काँग्रेसचे एक नेते बसले होते. बाप मुख्यमंत्री, मुलगा...भाचा मंत्री सर्व मंत्री घरातीलच...घराणेशाहीवर मुनगंटीवार यांनी टिका केली. देशासाठी नाही तर सत्तेसाठी हे पक्ष एकत्र येत असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करु शकत नाही. राहुल अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करतात. वीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काढतात. I.N.D.I.A आघाडीतून N.D.A. काढले तर फक्त दोन I उरले म्हणजे मी... फक्त मी त्यांच्या स्वभावात आहे. त्यांचे विचार इंग्रजांसारखे आहे. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलेले आहे. भारत किंवा हिंदूस्थान आघाडीचे नाव का ठेवले नाही. भारत मातेचा मृत्यु झाले असल्याचे राहुल गांधी अमेरीकेत जाऊन सांगतात...भारत मातेचा अपमान करतात. भारत मातेबद्दल त्यांना आदर नाही आणि निघाले पंतप्रधान बनायला. त्यांच्यामध्ये ते गुण नाही म्हणून पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासोबत आले आहे. आम्ही व्यक्तीगत राजकारण करत नाही तर देशसेवा व देशाच्या विकासासाठी करत आहे. आमच्यावर पक्ष फोडण्याचा आरोप करणाऱ्यांवर मुनगंटीवार यांनी टिका केली. तुम्हाला शिंदे व अजित पवार यांच्या सोबत जाणारा भाजपा आवडतो का या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले मला देशाची सेवा करणारा भाजपा आवडतो असे सांगितले. याचा अर्थ हे मुनगंटीवार यांना शिंदे आणि पवार सोबत आलेले आवडले नाही असाही अर्थ निघतो.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर टिका करताना त्यांनी सांगितले हि बैठक तेव्हाच सार्थक होईल जेव्हा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र द्यावे की महाराष्ट्रातील जी गावे हि कर्नाटकात आहे ते परत करत आहे. मुंबई तोडण्याचे आरोप लावले जात आहे हे निरर्थक आहे. कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करु शकत नाही. घराणेशाहीचे राजकारण करणा-यांना लोकशाही मार्गाने जनता धडा शिकवेल व आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार नारायण कुचे उपस्थित होते.
What's Your Reaction?