औरंगाबाद जिल्ह्यातील 20 मंडळातील 321 गावातील पिकांना फटका

औरंगाबाद जिल्ह्यात फक्त 20 मंडळांच्या 321 गांवांनाच मिळू शकते मदत
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. जिल्ह्यात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आभाळाकडे पाहत आहे. जिल्ह्याची पावसाची परिस्थिती बघितली असता जिल्ह्यात 83 मंडळापैकी 20 मंडळे मदतीसाठी सध्या पात्र आहे काही दिवसात आणखी काही मंडळाचा यामध्ये समावेश होऊ शकते. विम्याची नुकसानभरपाई या 20 मंडळातील 321 गावे आहेत अशी माहिती डि-24 न्यूजला कृषी अधिक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा 66.04 पाऊस पडल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. या महिन्यात मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबाद शहरात होत आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना मदतीचे पैकेज मिळेल अशी अपेक्षा आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्र 6 लाख 84 हजार 716 हेक्टर क्षेत्रातून खरीपाची 6 लाख 47 हजार 161 हेक्टर वर पेरणी झाली होती. एकूण पेरणी 94.53 टक्के झाली आहे. आता पाऊस पडला तरीही
पिकांची 30 ते 50 टक्के नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, चौका, पिसादेवी, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा, वैजापूर तालुक्यातील शिऊर, गारज, महालगाव, नागमठान, खंडाळा, बोरसर, जानेफळ, वैजापूर, घायगाव, लाडगाव/बाबतरा, गंगापूर तालुक्यातील मांजरी, भेंडाळा, शेंदुरवादा, सिध्दनाथ वडगाव, गाजगाव या मंडळाती 321 गावांमध्ये पिकांचे नुकसान जास्त असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या मंडळात विम्याच्या निकषांनुसार कमी पर्जन्यमान असल्याने विम्याची नुकसान भरपाई मिळेल. या मंडळात कोठे पावसाचा खंड 22 दिवस तर कोठे 16 दिवस तर काही गावांमध्ये 13 दिवसांचा खंड पडल्यामुळे पिके वाळत आहे. पिकांचे उत्पादनाला फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
What's Your Reaction?






