खुलताबाद येथील जर जरी जर बक्ष बक्ष उर्स महोत्सव निमित्त सामाजिक सलोखा वृध्दिंगत व्हावा- निवासी उपजिल्हाधिकारी
खुलताबाद येथील जर जरी जर बक्ष उर्स महोत्सवानिमित्त
सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत व्हावा- निवासी उपजिल्हाधिकारी
औरंगाबाद, दि.1 (डि-24 न्यूज)- खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष यांच्या 737 वा उर्स महोत्सवानिमित्त दि.21 ते 29 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उर्स महोत्सव पारंपारिक उत्साहात साजरा करतांना सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत व्हावा. त्यासाठी स्थानिक रहिवाशी आणि प्रशासनाने समन्वय राखावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी आज दिले.
जर जरी बक्ष उर्स महोत्सवानिमित्त उर्स व्यवस्था समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस खुलताबाद तहसिलदार तथा उर्स कमिटीचे अध्यक्ष स्वरुप कंकाळ, दर्जा कमिटीचे अध्यक्ष तथा उर्स कमिटीचे उपाध्यक्ष मोहम्मद एजाज एहमद सुलतान एहमद, मुख्याधिकारी खुलताबाद न.प. तथा उर्स कमिटीचे सचिव विक्रम दराडे, सदस्य ॲड हाजी कैसोरोद्दीन हाजी जहिरोद्दीन, मो. इम्रान मो. आबीद जहागिरदार, मो. अबरार मो. वसी तसेच स्थानिक पोलीस अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
उर्स महोत्सवातील जागा व्यवस्थापनाचे नियोजन यावेळी करण्यात आले. उर्स महोत्सवात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, या कालावधीत करावयाचे आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन, त्यासाठी करावयाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. उर्स कालावधीतील स्वच्छता, पाणी पुरवठा, अग्निशमन व्यवस्था, अंतर्गत दळणवळण व्यवस्था या नियोजनाची माहितीही सादर करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी विधाते म्हणाले की, हा उर्स महोत्सव साजरा करतांना सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा. प्रशासनाच्या वतीने सर्व विभागांनी समन्वयाने तयारी पूर्ण करा. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करावा. वैद्यकीय मदत कक्ष उभारावा. त्यासाठी नगरपालिका व स्थानिक प्रशासनाने समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी दिले.
What's Your Reaction?