शालेय मनपा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साहात प्रारंभ...!

 0
शालेय मनपा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साहात प्रारंभ...!

शालेय मनपा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साहात प्रारंभ...

547 विद्यार्थ्यांचा सहभाग...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मनपा अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात उपायुक्त अंकुश पांढरे, उपायुक्त सविता सोनवणे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार आणि क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत विविध शाळांमधील एकूण 547 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध गटांत ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात खिलाडूवृत्ती व संघभावना वाढीस लागावी, तसेच नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा स्पर्धेच्या आयोजना मागील उद्देश असल्याचे सांगितले.

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रीडा शिक्षक सचिन लव्हेरा, सागर मगरे, समीत शेख, अकिब जावेद तसेच कॅरम संघटनेचे पदाधिकारी अॅड. राजेश जंगम, उदय वझरकर, विक्रम भोसले, श्रावण तिखे आणि निसार शेख प्रयत्नशील आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow