"गरज सरो वैद्य मरो" गुंठेवारीसाठी स्वार्थी भुमिका घेऊ नका - राजेंद्र दाते पाटील

 0
"गरज सरो वैद्य मरो" गुंठेवारीसाठी स्वार्थी भुमिका घेऊ नका - राजेंद्र दाते पाटील

"गरज सरो वैद्य मरो " गुंठेवारी साठी स्वार्थी भूमिका घेऊ नका -राजेंद्र दाते पाटील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)-महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर गुंठेवारी योजनेत खुले प्लॉट व बांधकाम अधिकृत करण्यासाठी दुष्काळ सदृश स्थिती पाहता सहा महिने जुन्या निर्णया प्रमाणे मुदत वाढ देण्याचे आदेश तात्काळ करा अशी मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांचे कडे जनहितार्थ केली होती.

मागणीचे गांभीर्य लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी नगर विकास विभागा दोन चे प्रधान सचिव डॉ गोविंदराज यांना तातडीने निर्देश सुद्धा जारी केलेले असतांना मनपा मध्ये ट्रस्टी असणाऱ्यांनी जनहिताची भूमिका अपेक्षित असतांना "गरज सरो वैद्य मरो " गुंठेवारीसाठी स्वार्थी भूमिका घेऊ नये अशी मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केली आहे.

रविवार एक नोव्हेंबर रोजी जवाबदार ट्रस्टीनी घोषणा केली की,दंडाची रक्कम माफ केल्यामुळे नागरिकांची झुंबड उडाली असुन सदरची योजना आजपासून योजना एक नोव्हेंबर पासुन बंद केली जाणार आहे.

वास्तविक पाहता मनपा प्रशासनास या योजने मुळे मोठा महसूलच मिळणार असुन शहराच्या आसपास विकास आराखडा मंजूर नसताना अनेक जमीन मालकांनी अनधिकृत

प्लॉटिंग पाडून जमिनी विकल्या असे मनपा ट्रस्टी यांचे म्हणणे असुन याच बाबी मुळे शासनाने गुंठेवारी योजना सुरु केली असुन सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे " स्वतःचे घर " ही आत्मिक इच्छा मारू नये ही लोक भावना असतांना देखील ट्रस्टी मात्र मुदतवाढ देण्याला आमचा विरोध असल्याचे वक्तव्य करीत असल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनता हतबल झाली असुन असून 

महानगर पालिका छत्रपती संभाजीनगर गुंठेवारी योजनेत खुले प्लॉट व बांधकाम अधिकृत करण्या साठी दुष्काळ सदृश स्थिती पाहता व सनवाराचे, दिवाळीचे सन पाहता किमान सहा महिने जुन्या दर व निर्णया प्रमाणे मुदत वाढ देण्याचे आदेश तात्काळ जनहितार्थ व्हावेत अशी नम्र विनंती जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow