मुस्लिम कन्येची इस्त्रोमध्ये झेप, वैज्ञानिक प्रशिक्षणासाठी निवड, महाराष्ट्राची मान उंचावली...!
मुस्लिम कन्येची इस्त्रोमध्ये झेप, अफरोज खाटीकची वैज्ञानिक प्रशिक्षणासाठी निवड; महाराष्ट्राची मान उंचावली...
चाळीसगाव, दि.24(डि-24 न्यूज) - चाळीसगाव येथील खाटीक समाजाचे डॉ. मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक यांची कन्या कु. अफरोज खाटीक हिने आपल्या मेहनत, चिकाटी, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या केरळ येथील विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण व परिक्षण कार्यक्रमासाठी तिची परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे.
अफरोजच्या या उल्लेखनीय यशामुळे चाळीसगाव शहरासह खाटीक समाज आणि महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या कर्तृत्वाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
अथक परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर तिने हे यश मिळवले असून भविष्यातही ती अशीच यशाची नवी शिखरे गाठत राहो, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.
ज्ञानाच्या आकाशात भरारी घेत चाळीसगावच्या मुस्लिम कन्येने आता अंतराळाकडे यशाची झेप घेतली आहे म्हणून सर्व स्तरातून कौतुक होत आहे...!
What's Your Reaction?