जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत 8 उमेदवार बिनविरोध, महायुतीचा दबदबा...!

 0
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत 8 उमेदवार बिनविरोध, महायुतीचा दबदबा...!

जिल्हा बँक 8 उमेदवार बिनविरोध, महायुतीचा दबदबा 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, सिल्लोडचे आमदारपुत्र तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर, बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुनराव गाडे, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, अनिल बोरसे आणि संजय निकम यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याआधीच पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या विरोधात अर्ज न आल्याने त्यांचीही निवड निश्चित झाली होती. त्यामुळे एकूण आठ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात असून, केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

जिल्हा बँकेच्या 21 सदस्यीय संचालक मंडळासाठी येत्या 4 जुलै रोजी मतदान होणार आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र मंगळवारी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने शिरसाट यांचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, या निवडणुकीत अनेक प्रमुख चेहऱ्यांनी माघार घेतली आहे. आमदार सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेविका हर्षदा शिरसाट, रामराव शेळके, पूनमचंद बमणे, ज्ञानेश्वर मोठे, एकनाथ जाधव, राजू भुमरे, अप्पासाहेब पाटील, रवींद्र संचेती, गोकुळसिंह राजपूत, जयराम साळुंके, प्रमोद जगताप, वाजेद खान, अंकुश रंधे आणि प्रदीप शिंदे, शहानवाज खान यांच्यासह एकूण 83 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

तर दुसरीकडे, काही उमेदवारांना विजयासाठी अद्याप निवडणूक मैदानात उतरावे लागणार आहे. यात मंत्री अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, जगन्नाथ काळे, देवयानी डोणगावकर, आमदार अनुराधा चव्हाण, खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव आणि अभिषेक देशमुख यांचा समावेश आहे.

जिल्हा बँक निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow