उद्या पडेगाव ते मिटमिटा रोडवरील अतिक्रमण काढणार...!

उद्या पडेगाव ते मिटमिटा रोडवर कारवाई...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद),दि.2(डि-24 न्यूज)
उद्या पडेगाव ते मिटमिटा या रोडवर सेंटर पासून दोन्ही बाजूने 30 मीटरच्या अंतरापर्यंत मार्किंग करण्यात आली असून उद्यापासून अतिक्रमण निर्मूलन कारवाईची सुरुवात होणार आहे.
या रस्त्यावर मार्किंग झाली असून उद्या सकाळी 8 वाजेपासून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे यांनी दिली आहे. दिनांक 3 जून पासून प्रमुख रस्त्यांवरील सर्विस रोडच्या जागेवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेली आहे.
आतापर्यंत सदरील कारवाईत देवळाई चौक ते महानुभाव आश्रम, केंब्रिज नाका ते मुकुंदवाडी आणि महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीत महानगरपालिकेची हद्दीपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. वर नमूद सर्विस रोड दोन्ही बाजूने 30 मीटर रुंदीचे आहे. पडेगाव ते मिटमिटा रोडची मार्किंग झाली असून उद्यापासून या रोडवर देखील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलनाचे कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
What's Your Reaction?






