स्मार्ट मीटर मुळे विजेचा झटका, आचलला एक कोटीची नुकसानभरपाई द्या, स्मार्ट मिटर लावणे बंद करा...

स्मार्ट मीटरमुळे विजेचा झटका..!
आठ वर्षीय आचल अस्वलेला एक कोटीच्या नुकसान भरपाईची भाकपची मागणी... !
गुपचूप स्मार्ट लावणे बंद करा !
लावलेले मिटर काढून घ्या !
वीज दर कमी करा !
लोडशेडींग बंद करा !
या मागण्यांसाठी भाकपची पुन्हा ची तीव्र निदर्शने !
दिनांक 6 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी पुन्हा निदर्शने करणार... !
छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज), खाजगीकरणामुळे लोकांचा जीव धोक्यात, चिमुकल्या आचल अस्वलेला स्मार्ट मीटरमुळे विजेचा झटका लागल्याने ती गंभीर जखमी झाली व तिला अपंगत्व येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तिला तिच्या भविष्यासाठी एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केल्याने महावितरणचे धाबे दणाणले आहेत. याबाबत वाळूज पोलीस स्टेशनमध्ये भाकपच्या प्रयत्नातून कंत्राटदार कंपनी विरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आलेला आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी भाकपच्या वतीने स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात निदर्शना केली जातात याचाच एक भाग म्हणून आज सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण जुबली पार्क कार्यालय समोर तीव्र निदर्शने करून मुख्य अभियंता नहाटा यांना निवेदन देण्यात आले. वाळूज परिसरातील बकवाल नगर अजवा नगर येथे साधारणतः तीन फूट उंचीच्या अंतरावर लहान मुलांच्या हाताला लागतील निष्काळजीपणे स्मार्ट मीटर लावण्यात आले त्यामुळे आठ वर्षीय आचल अस्वले या चिमुकलीला तीव्र विजेचा झटका बसला आणि लाकडाच्या दांडक्याने तिला वेगळे करून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आजूबाजूच्या लोकांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे चार दिवस तिच्यावर उपचार झाले जीव वाचला परंतु एक पाय आणि एक हात नीट काम करत नसल्याने अपंग अपंगत्व किंवा शारीरिक शारीरिक वाढीवर वाईट परिणाम होतो की काय अशी भीती तिच्या पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. वडील मजुरी करतात आई भांडे काम करते महावितरण व कंत्राट दाराच्या निष्काळजीपणामुळे आचल अस्वले वर ही वेळ आली म्हणून तिच्या भविष्यासाठी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई महावितरण व कंत्राटदाराने द्यावी एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे. तीन फूट उंचीवर लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे. दोन बल्ब असणाऱ्या घरात पाच हजार रुपयांचे बिल कसे हजार रुपयापर्यंत बिल येत होते तेथे 55 हजार 65000 बिल कसे अंदाजे बिल देतातच कसे असे अनेक प्रश्न भाकपच्या शिष्टमंडळाने मुख्या अभियान त्यांना विचारले त्यावर ते निशब्द होते.
पुढील निदर्शने 6 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता महावितरण कार्यालय जुबली पार्क, छत्रपती संभाजीनगर येथे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहिल्यासच सरकारवर दबाव येऊ शकतो अन्यथा सध्या 11 रुपये 17 पैसे प्रति युनिट वीज बिल भरावे लागत आहे , स्मार्ट टी ओ डी मीटर युनिट लागल्यास 20 रुपये प्रति युनिट पेक्षा जास्त रकमेत घरगुती ग्राहकास वीज खरेदी करावी लागेल. व्यावसायिक ग्राहकास 20/- पेक्षा जास्त रक्कम आकारली जाईल, त्यामुळे जनतेला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. आज झालेल्या निदर्शनात दादा कॉलनी, कैलास नगर , वाळुंज अजवानगर , बकवाल नगर, बीड बायपास, एकता नगर , शंभू नगर तसेच शहरातील इतर भागातील नागरिक सहभागी झाले होते.
निवेदनात या आहेत मागण्या...
छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनी , शंभू नगर , भावसिंगपूरा, वाळूज , एकता नगर, बीड बायपास व शहरातील इतर भागात गुपचुप व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा.
लोकांची परवानगी नसतांना चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत असे सांगुन स्मार्ट मिटरच घ्यावे लागेले अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे व ज्या ठिकाणी अशा पध्दतीने स्मार्ट मिटर लावले आहेत ते तातडीने काढून घेतले पाहीजे.
सरकारी कार्यालये व सरकारी निवासस्थानावर लावलेले स्मार्ट मिटरही तातडीने काढून घेतले पाहीजे.
टीओडी पध्दतीची वीज नियामक आयोगांनी केस नंबर 217 /2024 अंतर्गत मंजूर केलेली छुपी व प्रचंड प्रमाणातील वीज दरवाढ कायमची रद्द करा.
एप्रिल 2024 च्या वीजदरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा.
मराठवाडयावर अन्याय करणारी छत्रपती संभाजीनगरची भेदभाव पूर्ण लोड शेडींग बंद करा.
सेक्यूरिटी डिपॉझीटच्या नावाने करत असलेली लूट बंद करा.
स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करा.
स्मार्ट मीटर विजेच्या धक्क्यामुळे जखमी आचल अस्वले वय आठ वर्ष हीच एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्या.
या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता ( प्रशासन ) राजेंद्र पी नाहटा यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मोठ्या संख्येने पुन्हा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यासाठी येणार आहेत हेही निक्षूण सांगण्यात आले. निदर्शनात मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजेच 6 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजता ज्युबली पार्क येथील महावितरण कार्यालया समोर पुन्हा मोठ्या संख्येने निदर्शने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड . अभय टाकसाळ , कॉ. राजू हिवराळे कॉ रफीक बक्श , कॉ. मधूकर गायकवाड , कॉ अनंता कऱ्हाळे, कॉ. सय्यद मकसूद अली उर्फ मुन्नाभाई, किशोर हरिश्चंद्रे, आवेज शेख, सय्यद शौकत , अभिजीत बनसोडे , एजाज शेख, समाधान पारधे, शेख अफसर, शेख रफीक टेलर, फकीरचंद थोरात, निलेश दिवेकर , संतोष बिरारी , दीपक जाधव, गौतम शिरसाट , प्रमोद नाडे, आरिफ सय्यद, ऋषी रुपेकर ,रोहित इंगळे, नीलिमा भिंगारे, अजहर शेख, वच्छला वाघ, शांताबाई शिरमाळी ,जया तिवारी, जगन्नाथ तिवारी ,रेखा साळवे, भाऊ पठाडे, राजेंद्र उंटवाल, गौतम शिरसाट ,संतोष चौधरी,
यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते .
What's Your Reaction?






