उद्या होणा-या TET परीक्षेचा पेपर फुटला...? परीक्षा पुढे ढकलली...!

 0
उद्या होणा-या TET परीक्षेचा पेपर फुटला...? परीक्षा पुढे ढकलली...!

TET 2026 परीक्षा पुढे ढकलली; प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

पुणे, दि. 27(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे 7 लाख 8 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.

मात्र, दि. 27 जून 2026 पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथील एका इसमाकडे TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात त्याच्याकडे TET परीक्षेतील काही प्रश्नांशी साम्य असलेली माहिती आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दि. 28 जून रविवारी रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow