अखेर डॉ.गफ्फार कादरी यांचा राजीनामा, काँग्रेसचा हात थामणार, इम्तियाज जलील यांच्यावर चिटर असल्याचा आरोप

 0
अखेर डॉ.गफ्फार कादरी यांचा राजीनामा, काँग्रेसचा हात थामणार, इम्तियाज जलील यांच्यावर चिटर असल्याचा आरोप

अखेर डॉ.गफ्फार कादरी यांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप...

डॉ.कादरी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात एमआयएमला मोठे खिंडार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले... 23 सप्टेंबर रोजी ओवेसींना लिहलेल्या पत्राची प्रत यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. त्यांचे राजकारणात संपवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी कसे कटकारस्थान रचले याचा पाढाच पत्रकार परिषदेत त्यांनी वाचला... इम्तियाज जलील चिटर आहे...मला पूर्व मधून पाडण्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) अखेर आज एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी आपल्या प्रदेश कार्याध्यक्ष व सदस्य पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. खासदार असदोद्दीन ओवेसी यांना ई-मेलवर पाठवला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे. 

त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात एमआयएमला मोठे खिंडार पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप लावताना सांगितले की माझा पत्ता औरंगाबाद पूर्व मधून कट करुन भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांना मदत कशी होईल यासाठी एमआयएमचा कमकुवत उमेदवार द्यायचा यासाठी जलील यांनी कट कारस्थान रचले. मला उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षाकडे अनेक प्रयत्न केले माझा अपमान पक्षात राहून झाले. सन 2014 पासून पक्षबांधणी राज्यात करुन संघटन उभे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला परंतु हैदराबाद येथे औरंगाबाद पूर्वसाठी उमेदवारी मिळावी यासाठी गेलो असता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी पाच मिनिटे वेळ दिला नाही. यांची खंत वाटते. त्यानंतर त्यांना पत्र लिहून कैफीयत मांडली. जेव्हा औरंगाबाद दौऱ्यात ओवेसी आले तेव्हा त्यांनी इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे माझ्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली. इम्तियाज जलील यांनी माझ्या विरोधात कान भरुन ते ओवेसी जलिल यांचेच ऐकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर पक्ष चालवतात. पक्षाचे अध्यक्ष मला वेळ देत नसतील तर मी जे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रातून पक्षासोबत जोडले त्यांचे काय असा प्रश्न डॉ.कादरींनी विचारला. इम्तियाज जलील हे 2019 मध्ये वंचितमुळे खासदार बनले त्यानंतर त्यांची गरज संपली फडणवीस यांच्या इशा-यावर 2019 विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत झालेली युती तोडली. हि युती तुटली नसती तर 15-20 आमदार निवडून आले असते. एड बाळासाहेब आंबेडकर एवढे मोठे नेते आहेत त्यांच्या वंचितसोबत युती करण्यासाठी माझे योगदान असताना त्यावेळी आंबेडकरांना पत्र लिहताना एवढ्या मोठ्या नेत्याला डियर लिहले. आपणच एमआयएम मध्ये आमदार, खासदार व मोठे नेते राहावे असा इम्तियाज जलील यांचा स्वभाव आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना सर्व निवडणुका लढण्यास त्यांना मोकळीक आहे आणि दुस-यांकडे ते आपल्या पदाचा राजीनामा मागतात. मुंबईत असेच घडले. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात माझे काम असल्याने लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना 89 हजार मते मिळाली. दोनदा याच मतदारसंघातून थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला परंतु यावेळी जिंकण्यासाठी लढायची मी तयारी केली आहे. काँग्रेस हायकमांडशी दिल्लीत भेट घेतली. मला पूर्ण विश्वास आहे मला महाविकास आघाडीच्या वतीने कांँग्रेसचे तिकीट मिळेल. अंबादास दानवे जेव्हा औरंगाबाद जालना एमएलसीच्या निवडणुकीत उभे होते एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांना मदत केली परंतु इम्तियाज जलील यांनी त्या नगरसेवकांना काही दिले नाही, काँग्रेसचे उमेदवार कुलकर्णी यांच्याकडून सुध्दा पैसे खाल्ले अशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या असा गंभीर आरोप डॉ.कादरी यांनी केला आहे. नांदेडमध्ये इम्तियाज जलील निवडणुकीत उभे राहणार असल्याचा त्यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की काँग्रेसने मला पूर्व मधून उमेदवारी देऊ नये यासाठी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी त्यांनी अशी घोषणा केली. जालिल यांनी औरंगाबाद पूर्व मधून निवडणूक माझ्या विरोधात लढावी असे आव्हान पण त्यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. भाजपासोबत इम्तियाज जलील मिलीभगत करून राजकारण करत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत भेट घेतली हा फक्त निवडणूक समोर ठेवून दिखावा आहे. मराठा समामासोबत त्यांना सहानुभूती नाही ते फक्त स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप डॉ.कादरी यांनी लावला आहे.

एमआयएम पक्षात एकजूट आहे- शारेक नक्शबंदी 

डॉ.कादरी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडतील का..हे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांना विचारले असता पक्षात फुट पडणार नाही. डॉ.कादरी यांच्या गेल्याने पक्षावर काही परिणाम होणार नाही. इम्तियाज जलील यांच्या वर त्यांनी लावलेले आरोप फेटाळले. त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून ते असले खोटे आरोप करत आहे. राज्यात इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे. निवडणूकीवर कादरींच्या जाण्याने फरक पडणार नाही. पक्षाने जो उमेदवार दिला प्रमाणिकपणे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते एकजूटीने प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow