निवडणूक कामात निष्काळजीपणा, 13 शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ...!
निवडणुक कामात निष्काळजीपणा, 13 शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक -2024 साठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कामांच्या जवाबदारी दिली आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लेखी आदेश, कारणे दाखवा नोटीस देऊन देखील कर्मचारी निवडणूक कामी हजर होत असल्याने वेदांतनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी नायब तहसीलदार मुकुंद बाबूराव उन्हाळे यांच्या फिर्यादीवरून 13 शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.
यामध्ये अमोल सुभाष सोनवणे, कनिष्ठ लिपिक, कार्यालय उपसंचालक शिक्षण विभाग भडकलगेट, अमोल सुभाष ताठे, कनिष्ठ लिपिक कार्यालय मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक, आरोग्य सेवा विभाग, मोगल मोईज बेग, लिपिक, कार्यालय क्षेत्रिय डेअरी विकास अधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरी, योगेश प्रमोद कुलकर्णी, लिपिक, कार्यालय कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, स्वप्नील पी.कुलकर्णी, कार्यालय कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, प्रदीप जाधव, कनिष्ठ लिपिक, कार्यालय वार्ड अधिकारी महानगरपालिका, मालखरे अपार्टमेंट, वार्ड कार्यालय क्र.7, मिर्झा अकबर बेग, कनिष्ठ लिपिक, मनपा वार्ड क्रं 7, शेख शौकत नबी , लॅब असिस्टंट, कार्यालय मोईन उल उलूम हायस्कूल, सिल्कमिल काॅलनी, रेल्वेस्टेशन, सय्यद इरशाद सह शिक्षक, कार्यालय मोईन उल उलूम हायस्कूल, रियाज शेख, सह शिक्षक कार्यालय, मोइन उल उलूम हायस्कूल, टी. एस.चव्हाण, सहशिक्षक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय, भिमनगर, भाऊसिंगपूरा, ज्ञानेश्वर डी.कड, सहशिक्षक, कार्यालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय, नंदा विनायक राठोड, सहशिक्षक, कार्यालय अनंत भालेराव विद्यामंदिर, चेतनानगर यांच्यावर गुर न व कलम 171/2024 कलम 32, 134 लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डहाके करत आहे.
What's Your Reaction?