जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा दुर्देवी मृत्यू...!

जिल्ह्यात वीज पडून दोन बालकांचा दुर्देवी मृत्यू...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. सोयगाव तालुक्यात वीज पडून दोन बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जंगली कोटा येथे अजिनाथ नथू राठोड, वय 18 व मौजे हनुमंतखेडा येथील अश्विनी मच्छिंद्र राठोड, वय 14 या दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाने दिली आहे.
What's Your Reaction?






