आदर्शच्या ठेविदारांच्या डोळ्यात अश्रू अनावर...!
आदर्शच्या ठेविदारांच्या डोळ्यात अश्रू अनावर, ठेविदारांसाठी लढत राहणार इम्तियाज जलील
या निवडणूकीत ईव्हिएमवर शंका उपस्थित केली, माध्यमातून या बातम्या येत असताना जनतेचा ध्यान हटवण्यासाठी संभल व अजमेरची घटना समोर आली... निवडणुकीत काय गडबडी झाली याबाबत आपल्या भाषणात सविस्तर माहिती इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी आज दुपारी आदर्शच्या ठेविदारांनी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या गळ्यात पडून ठेविदारांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
यावेळी इम्तियाज जलील यांनी त्यांना धीर दिला खचून जाऊ नका. मी तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी लढत राहणार आहे. निवडणुकीत जय पराजय होत असतात. या निवडणूकीत विरोधी पक्षातील उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी कसा पैशांचा पाऊस पडला गेला त्याचे पुरावे निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना दिले तरीही सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे. पैसे वाटप करणे, बोगस मतदानाचे व्हिडिओ दिले तरीही गरीबांसाठी लढणा-यावर गुन्हे शाहनिशा न करता दाखल करण्यात आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काय घडले सर्वांना माहीत आहे. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली जात आहे यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न जशाच्या तशा राहत आहेत. राज्यात अनेक पतसंस्थेत घोटाळे उघडकीस आले त्या खातेदारांचे पैसे परत मिळावे म्हणून आदर्शच्या आंदोलनामुळे विविध पक्षांच्या नेत्यांना ठेविदार आता प्रश्न विचारत आहेत. जे गुन्हे माझ्यावर दाखल झाले घरी न बसता गोर गरीब जनतेच्या विविध प्रश्नांसाठी लढत राहणार आहे. बोगस मतांची चोरी पकडली तर अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला. असे दोन गुन्हे दाखल झाले तरीही जनतेचे प्रश्नांसाठी लढत राहणार आहे.
डोळ्यात अश्रू आणू नका आपले हे प्रेम असेच असू द्या पराभवानंतर हेच प्रेम माझे आत्मविश्वास वाढवत आहेत. मी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव न घेता राजकारण केले. विकासावर बोललो... सर्व जाती धर्मातील लोकांनी मतांच्या रुपाने आशिर्वाद दिला त्याबद्दल आपल्या भाषणात इम्तियाज जलील यांनी जनतेचे आभार मानले. छत्रपतींच्या नावाचा वापर न करता सर्व जाती धर्मासाठी लढा दिला. प्रचारादरम्यान जयभवानी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तेथे आले त्यांनी सांगितले येथे यानंतर यायचे नाही असा दम भरला तरीही वातावरण खराब होऊ नये म्हणून काही न बोलता तेथून परत प्रचारासाठी निघालो. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे शुध्दीकरण केले हे दुर्दैव आहे. अशी आपबिती इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात पराभवावर मिमांसा करताना आदर्शच्या ठेविदारांसमोर मांड
ली.
What's Your Reaction?