शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिस हाॅलचे थाटात उद्घाटन...
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिस हॉलचे भव्य- थाटात उद्घाटन...
जागतिक दर्जाच्या शहरातील टेबल टेनिस हॉलच्या जलद गती कार्याचे अचंता शरथ कमलतर्फे मुक्तपणे कौतुक...
उच्च ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रमाची गरज - पद्मश्री अचंता शरद कमल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - आपले ध्येय नेहमी उंच ठेवा. कठोर परिश्रमाने ध्येयपूर्तीचा संकल्प गाठता येतो. मेहनतीने यशोशिखर गाठता येते. संकल्प लहान ठेवला तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. असे प्रतिपादन टेबल टेनिस पद्मश्री पुरस्कार विजेते अचंता शरद कमल यांनी केले. यावेळी जागतिक दर्जाच्या टेबल टेनिस हॉलचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
महानगरपालिका टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बायजीपुरा येथील सर्व सुविधा युक्त टेबल टेनिस क्रीडा हॉलचे उद्घाटन प्रसंगी अचंता शरद कमल बोलत होते.
यावेळी मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत, लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर, नगरसेवक ओसामा अब्दुल कदिर मौलाना, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, नगरसेवक रामेश्वर भादवे, संगीता सांगळे, संजय कडू, निलेश मित्तल, विक्रम डेकाटे, कुलजितसिंग दारोगा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री अतुल सावे, राजेंद्र दर्डा, आयुक्त जी श्रीकांत यांनी अल्पावधीत हाॅल निर्मिती बद्दल संघटनेच्या कार्याचे कौतुक करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील असा आशावाद व्यक्त करून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
संघटना अध्यक्ष निलेश मित्तल प्रास्ताविक मनोगतात म्हणाले की, माझे 20 वर्षांनी टेबल टेनिस खेळात पुनरागमन झाले त्यावेळी करण यांनी टेबल टेनिसच्या दुरवस्थेबद्दल सांगितले होते. संघटनेत राष्ट्रीय खेळाडू आहेत मंत्री अतुल सावे आयुक्त जी. श्रीकांत, क्रीडा प्रेमींच्या सहकार्याने इतिहासात नोंदवले गेलेल्या हॉलचे अतिजलद गतीने 120 दिवसात काम पूर्ण झाले. यामागे सर्वांचे सहकार्य योगदान लाभले. राज्य वरिष्ठ संघटना सदस्यांनी व देशभरातील क्रीडा प्रेमींनी या कृतिशील कार्याचे कौतुक केले असे निलेश मित्तल यांनी सांगून कृतज्ञता भावना व्यक्त केली.
प्रारंभी संघटना अध्यक्ष निलेश मित्तल, विक्रम डेकाटे, राज जैस्वाल, कुलजीतसिंग दरोगा, श्रीपाद जोशी, डॉ.सुहरीद अन्नछत्रे, मनोज कानोडजे, किशोर उबाळे, सचिन पुरी, जगन्नाथ वाघ, संध्या पंतोजी, अभिजीत तांबोळी, चेतन डेखाटे, देसाई आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी राज्य संघटनेचे अतुल गोलवणकर, प्रकाश तुळपुळे तसेच महानगरपालिकाचे
रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, अपर्णा थेटे, संजय कोंबडे, बाळासाहेब शिरसाट, पूजा भोगे तसेच खेळाडू व शालेय विद्यार्थी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?